एअरटेल देणार १जीबीच्या किंमतीत १५ जीबी डेटा!

airtel
नवी दिल्ली: देशातील वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यामध्ये रिलांयस जिओच्या लॉन्चनंतर कमी दरात सेवा देण्याची स्पर्धा सुरू झाली असून आपल्या ग्राहकांना वोडाफोन, बीएसएनएल ह्या कंपन्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत; अशात देशातील सर्वात मोठी टेलोकॉम कंपनी एअरटेलही समोर आली आहे. या स्पर्धेत सामिल झालेल्या एअरटेलने आता १ जीबी इंटरनेट डेटाच्या किंमतीत १० जीबी डेटा देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे केवळ २५९ रुपयांमध्ये एअरटेल ग्राहकांना १५ जीबी डेटा देणार असल्याचे समजते.

यासंदर्भात एका वेबसाईटने वॄत्त दिले असून या वेबसाईटने यासाठी एक लिंकही शेअर केली आहे. ग्राहकांना आपल्या सॅमसंग गॅलक्सी स्मार्टफोनवरून या लिंकवर जायचे आहे आणि मग ग्राहक या सेवेचा फायदा घेऊ शकतात. यासोबतच आणखी सूचना करण्यात आली आहे की, या लिंकवर जात असताना तुमच्या फोनचे वाय-फाय बंद असले पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या डेटा पॅकचा वापर करावा लागेल. तेव्हाच तुम्हाला ही सेवा घेता येईल. ही सुविधा तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही एअरटेल स्टोरमध्ये जाऊनही घेता येईल, असे या वृत्तात सांगण्यात आले आहे.

यासोबत आणखी एका वेबसाईटने अशी माहिती दिली आहे के, या ऑफरची सेवा घेण्यासाठी तुमच्याकडे सॅमसंग गॅलक्सीचा जे सीरीजचा स्मार्टफोन असायला हवा. तसेच असेही सांगण्यात आले आहे की, या सीरीजच्या स्मार्टफोनसोबत एअरटेल काही दिवसांआधी १० जीबी डेटा देत होते. त्यामुळे या ऑफरचा लाभ नवीन ग्राहक घेऊ शकतात. अजून याबाबत एकरटेलकडून काहीही सांगण्यात आले नाही.

2 thoughts on “एअरटेल देणार १जीबीच्या किंमतीत १५ जीबी डेटा!”

Leave a Comment