युनिक नंबरच्या छंदासाठी मोजले ६० कोटी रूपये

dubai
दुबईतील एका भारतीय उद्योजकाने त्याच्या अनेक महागड्या गाड्यांपैकी एक रोल्स राईस गाडीसाठी दुबईत भरलेल्या युनिक नंबर लिलावात सिंगल डिजिट कार रजिस्टेशन नंबरसाठी तब्बल ९० लाख डॉलर्स म्हणजे ६० कोटी रूपये मोजले आहेत. बलविंदर साहनी उर्फ अबु सबाह असे या उद्योजकाचे नांव असून त्यांना युनिक नंबर प्लेटचा छंद आहे. त्यांनी आजपर्यंत अशा १० नंबर प्लेट वेळोवेळी खरेदी केलेल्या आहेत असेही समजते.

साहनी म्हणाले मला ९ नंबर अतिशय आवडतो. दुबईच्या रोडस ट्रान्स्पोर्ट अॅथोरिटीतर्फे दर दोन महिन्यांनी युनिक नंबरसाठी लिलाव केला जातो. त्यांनी ६० कोटी रूपये खर्चून घेतलेला नंबर आहे डी ५. या आकड्याची बेरीज संख्याशास्त्राप्रमाणे ९ होते असे त्यांचे म्हणणे आहे. हा नंबर मिळविल्याचा त्यांना अभिमान आहे. गतवर्षीही त्यांनी ०९ या नंबरसाठी २५ दशलक्ष दिनार मोजले होते.साहनी यांची आरएसजी नावाची प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी असून त्यांच्या शाखा यूएई, कुवेत, भारत व अमेरिकेत आहेत.

Leave a Comment