फक्त ४ हजार रुपयांत झेनचा नवा स्मार्टफोन

zen
मुंबई : नवा सिनेमॅक्स फोर्स हा स्मार्टफोन मोबाईल उत्पादक कंपनी झेनने लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ४२९० रुपये ऐवढी असून ६ महिन्यांत स्क्रीन तुटल्यास फ्रीमध्ये बदलून दिली जाईल अशी ऑफरही कंपनीने ठेवली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझोल्यूशन ८५४ x ४८० पिक्सेल आहे. त्याच बरोबर अँड्रॉईड ६.० मार्शमैलो ऑपरेटिंग सिस्टम, १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर आणि ५ मेगापिक्सेलचा रिअर तर २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २९०० mAh ऐवढी आहे.

Leave a Comment