फोर्डच्या इंडेव्हरच्या किंमतीत लाखांची कपात

ford
मुंबई: फोर्ड इंडियाने आपल्या इंडेव्हरच्या किंमतीत तब्बल २.८२ लाखांची घट केली असून ही कपात ट्रेंड व्हेरिएटंमध्ये करण्यात आली असून मात्र टाययेनियम व्हेरिएंटच्या किंमतीत कोणतेच बदल करण्यात आलेले नाही.

फोर्डने मागील महिन्यात फिगोच्या हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडान एस्पाअरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. दोघांची किंमत ९१,००० पर्यंत कमी करण्यात आली होती. इंडेव्हर एसयूव्हीची विक्री वाढविण्यासाठी दिवाळीचा मुहुर्त आणि नोव्हेंबरमध्ये टोयोटोची येणारी नवी फॉर्च्युनर कारला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment