पाकिस्तानी सैनिकांना धडा शिकविणारी घंटीयाळी माता

ghantali
जैसलमेर पासून १५० किमी वर असणार्‍या चमत्कारी तनोट माता मंदिराची माहिती आपण पूर्वीच घेतली आहे. या देवीची धाकटी बहीण असलेल्या घंटियाळी माता मंदिराची ही कथाही अनोखीच आहे. हे मंदिर तनोट माता मंदिराच्या अलिकडे पाच किमीवर आहे. येथेही भारत पाक युद्धाच्या वेळी अनेक चमत्कार मातेने दाखविले होते व या मंदिराच्या पूजाअर्चेची जबाबदारीही सीमा सुरक्षा दलाकडेच आहे.

माता घंटियाली दरबार अशा नावाने हे स्थळ प्रसिद्ध आहे. येथील पुजारी सुनील अवस्थी यांनी या मंदिरात घडलेले अनेक चमत्कार सांगितले. विशेष म्हणजे १९६५ व १९७१ अशा भारत पाक युद्धातच हे चमत्कार घडले होते. पुजारी सांगतात १९६५ च्या युद्धात पाक सैनिका दोन बाजूंनी हल्ला चढवित होते पण या मंदिराजवळ येताच अमोरासमोर येत असलेल्या या दोन्ही सैनिकी तुकड्यांचा गोंधळ उडाला व त्यांनी समोरच्याला शत्रू समजून आपल्याच सैनिकांना ठार केले होते. या मंदिरावरही पाक सनिकांना जोरदार गोळीबार केला होता मात्र मंदिराचे नुकसान होऊ शकले नव्हते.

या मंदिरात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी मातेचा शृंगार उतरविण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे सैनिक पूर्ण आंधळे झाले होते. हे मंदिर ८०० ते १२०० वर्षे प्राचीन आहे व मातेचा सिद्ध दरबार अशी त्याची प्रसिद्धी १९७१ च्या भारत पाक युद्धापासून झाली आहे. प्रत्येक युद्धाच्या वेळी या मातेने भारतीय सैनिकांची पाठराखण केली आहे व त्यामुळे तिची पूजाअर्चा करण्याचा मान सीमा सुरक्षा दलाकडेच आहे.

Leave a Comment