जीसॅट-१८चे उड्डाण खराब हवामानामुळे २४ तासासाठी रोखले

gasat
बंगळुरू – खराब हवामानामुळे २४ तासांसाठी भारताचे संवाद उपग्रह जीसॅट-१८ चे उड्डाण पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने सांगितले आहे.

गौनामधील कोवरोऊ येथून तेथील स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे अरियन स्पेस रॉकेटच्या माध्यमातून जीसॅट-१८ अवकाशात झेपावणार होते. मात्र जोरदार वारा वाहत असल्यामुळे उड्डाणाला अडचणी येत आहेत. त्यामुळे हे उड्डाण २४ तासाने पुढे ढकलण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार, हे उड्डाण ६ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजताचा सुमारास होणार होते, असे इस्त्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले आहे. अरियन उपग्रहवाहू रॉकेटद्वारे जीसॅट-१८ सह ऑस्ट्रेलियाचे स्काय मस्टर दसरे हेही अवकाशात झेपावणार होते.

Leave a Comment