१४ देशांची डेंग्यूवरील लशीला मान्यता

dengue
पॅरिस – १४ देशांत डेंग्यूवरील लशीला मान्यता देण्यात आल्याची माहिती या औषधाची निर्माती करणाऱ्या सानोफी पास्टेउर या फ्रेंच कंपनीने दिली आहे. या औषधास इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, मेक्‍सिको, फिलीपीन्स, ब्राझील, एल साल्व्हाडोर, कोस्टारिका, पॅराग्वे, ग्वाटेमाला, पेरू या देशांनी मान्यता दिली आहे.

वाढती लोकमान्यता या औषधास मिळत असल्याचे पाहणे हा आनंददायी अनुभव आहे. २०२० पर्यंत मृत्युदरामध्ये ५० टक्‍क्‍यांची घट करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेचे ठेवलेल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी नवे, परिणामकारक साधन या औषधाच्या माध्यमामधून मिळाले आहे, असे कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment