सोशल मीडियावर ‘५६ इंच छाती’चा दाखला

narendra-modi
नवी दिल्ली – पाकिस्तानात घुसून भारतीय जवानांनी सर्जिकल हल्ला चढवल्यामुळे देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले जात आहे. मात्र, सोशल मीडियावरून तर भारतवासी मोदींचे कौतुक करत सुटले आहेत.

५६ इंच छाती, रजत शर्माला दिलेली मुलाखत, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, केरळमधील भाषण, वाघ, शेर असे अनेक विशेषणे देऊन मोदींच्या कामांवर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, भारताने केलेली कारवाई अभिमानस्पद असली तरी जवानांनी पुन्हा अशी कारवाई करून पाकला चांगला धडा शिकवावा, असा सूर आता भारतीयांमधून निघू लागला आहे.

Leave a Comment