मोबाईल अॅपवर पीएफचे पैसे मिळवा

epfo
नवी दिल्ली – नोकरी करणा-यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम काढण्यासाठी भरपूर धडपड करावी लागते, अनेक फे-या कार्यालयात माराव्या लागतात. मात्र, आता तुम्ही घर बसल्या पीएफचा पैसा काढू शकणार आहात.

लवकरच एक मोबाईल अॅप ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निधी संघटना) उपलब्ध करणार असून पेंशनर्स या अॅपच्या माध्यमातून घरी बसल्या आपल्या पीएफचा आणि हक्काचा पैसा काढू शकणार आहेत. या अॅपमुळे पेंशनर्सला कागद पत्रांची पूर्तता करावी लागणार नाही.

या अॅपसोबत पेंशनर्सला आधारकार्ड लिंक करावे लागणार आहे. ज्याच्या माध्यमातून त्यांचे विरेफिकेशनही केले जाणार आहे. यासाठी ईपीएफओ बँकांसोबत संपर्क करत असुन लवकरच हे अॅप उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या अॅपच्या माध्यमातून नागरिकांना सोप्या पद्धतीने आणि घरबसल्या पीएफचे पैसे मिळणार आहेत. या सुविधेचा फायदा देशभरातील लाखो पीएफधारकांना होणार आहे.

Leave a Comment