एटीएमद्वारे मिळू शकतील विविध प्रकारच्या सुविधा!

atm
मुंबई – भविष्यात विविध कामे करताना पैसे काढणे अथवा भरण्यासाठी उपयोगात येणारे एटीएम मशिन दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. आता बील जमा करणे, मुव्ही आणि फ्लाइटचे तिकीट बुक करणे एटीएम मशिनद्वारे शक्य होणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्डचा वापर न करता, केवळ नोंदणीकृत मोबाईल आणि आधार कार्डाच्या माध्यमातून ही सर्व कामे करणे शक्य होणार आहे.

बील भरणा करण्यापासून चालू बाजारभावाने सोन्याची नाणीदेखील या नव्या एटीएम मशिनद्वारे खरेदी करता येतील. अशाप्रकारची अनेक कामे देशात लवकरच एटीएमच्या माध्यमातून पार पाडताना दिसतील. अनेक काम करणारी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली एटीएम मशिन्स ‘एफएसएस’, ‘सीएमएस’, ‘एजीएस’सारख्या एटीएम मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या लॉन्च करणार असल्याचे समजते. या मशिनद्वारे फॉरेन एक्स्चेंज, लोन रिपेमेंट, बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि डीटीएच रिचार्जसारखी कामेदेखील करणे शक्य होईल.

मुंबईतील ‘एजीएसच्या इनोव्हेशन सेंटर’मध्ये सोन्याची नाणी देणाऱ्या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. या मशीनद्वारे प्रमाणपत्रासह सोन्याची नाणी प्राप्त करता येऊ शकतात. सोन्याची नाणी प्रदान करणारे वैशिष्ट्य भारतीय बाजारपेठेत आकर्षणाचा विषय ठरणार आहे. आमच्या ‘सीआयएनईओ सी४०६०’ मॉडेलच्या मशीनमध्ये अनेक वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. या मशीनमध्ये अन्य वैशिष्ट्यांसोबत पासबुक आणि स्टेटमेंट प्रिंटिंगबरोबरच सोन्याची नाणी प्राप्त करण्याचे वैशिष्ट्य अंतर्भुत करण्यात आल्याची माहिती एजीएसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवि गोयल यांनी दिली.

या मशीनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील लक्ष पुरविण्यात आले असून, आग आणि मशीन बंद पडण्यासारख्या समस्यांचा विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बँकेत खाते उघडण्यापासून डेबिट कार्ड इश्यू करण्याचे कामदेखील या मशीन्सद्वारे शक्य होणार असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबरच ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज आणि कारचे इंन्शुरन्स करणेदेखील शक्य होणार आहे.

1 thought on “एटीएमद्वारे मिळू शकतील विविध प्रकारच्या सुविधा!”

Leave a Comment