
मोटोरोलाने सर्वप्रथम अँड्राईडचे नवी नगेट ७.० ओएस ज्या मॉडेल्साठी अपडेट करून दिली जाणार आहे त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यता मोटो झेड सिरीज, मोटो जी ४, जी ४ प्लस यांचा समावेश आहे. २०१६ च्या आक्टोबर ते डिसेंबर या काळात कंपनी हे अपडेट जारी करणार आहे असेही समजते. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर या संदर्भातली कोणतीही सूचना दिली नसली तरी ड्राईड लाईफला मुलाखत देताना कंपनीच्या प्रवक्त्यांनी या बातमीला पुष्टी दिली आहे.
मोटोरोलाच्या या मॉडेल ना मिळणार अँड्राईड नगेट ७.० अपडेट
अँड्राईड नगेट ७.० मोटो झेडच्या फोर्स, प्ले साठी दिले जाईल. विंडो सपोर्ट, इनहास्ड नोटिफिकेशन, नंबर ब्लॉकिंग, चांगला बॅटरी बॅकअप शिवाय डेटा सेव्हर, बॅकग्राऊंड ऑप्टिमायझेशन अशी या ओएसची फिचर्स आहेत.
