या जेलमध्ये जाण्यासाठी चुरशीची स्पर्धा

hoshangabad
जेल किंवा तुरूंगात जाण्यासाठी कुणी उत्सुक असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. उलट आरोपीसुद्धा तुरूंगवास टळावा म्हणून अखेरपर्यंत आटापिटा करत असतात. अर्थात कांही अट्टल गुन्हेगार म्हणजे डॉन वगैरे सुरक्षित राहण्यासाठी जेलचा आधार घेत असतील पण सर्वसामान्य गुन्हेगारांनाही तुरूंगवास नको असतो. मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील तुरूंग मात्र याला अपवाद आहे. तुरूंगवास होणार हे नक्की असेल तर कैदी या जेलमध्ये आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून बड्या बड्या नेत्यांच्या शिफारसीही आणतात. मात्र येथे असल्या शिफारशींचा कांहीच फायदा होत नाही कारण येथे काटेखोरपणे कैद्यांनी निवड करून त्यांना प्रवेश दिला जातो.

होशंगाबादचा हा खुला तुरूंग व्यवसाय नोकरीच्या सुविधांसाठी सर्वात उत्तम आहे. येथे फक्त २५ कैद्यांची व्यवस्था केली जाते व त्यासाठी अर्ज येतात २०० हून अधिक. या कारागृहात परिस्थितीने ज्या लोकांना गुन्हा करण्यास भाग पडले अशांनाच प्रवेश दिला जातो. कुटुंबवत्सल व शिक्षा संपण्यास थोडाच कालावधी असलेल्यांना येथे प्राधान्याने प्रवेश दिला जातो तसेच प्रवेश देताना या गुन्हेगारांना तुरूंगातून बाहेर पडल्यावर पुन्हा गुन्हा करणार नाही असा विश्वासही तुरूंगाधिकार्‍यांच्या मनात निर्माण करावा लागतो. येथे राहून व व्यवसाय नोकरी करून अनेकजण लखपती बनले आहेत. कुणाला या कारागृहात प्रवेश द्यायचा त्याची निवड जेल मुख्यालयाची कमिटी करते व तेथे कोणतीही शिफारस चालत नाही.

मध्यप्रदेशात सध्या होशंगाबाद येथेच असा तुरूंग आहे पण या वर्षअखेर सतना येथेही असा तुरूंग सुरू केला जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment