बायोमेट्रिक पद्धतीने होणार साईबाबांचे दर्शन

saibaba
नगर – शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन यापुढे भाविकांना हायटेक पद्धतीने करता येणार असून शिर्डीमध्ये लवकरच बायोमेट्रिक पद्धतीने दर्शन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता रांगेत अधिक काळ उभे न राहता अगदी सहज दर्शन मिळणार आहे.

भाविकांना यासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी आधी नोंदणी करावी लागणार आहे. दिलेल्या वेळेनुसार भाविकांना अवघ्या काही वेळेत दर्शन करता येणार आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना तासनतास रांगा लावाव्या लागणार नाही आणि त्यांचे दर्शन देखील अधिक सुखकर आणि आनंददायी असणार आहे. तसेच दर्शनाची नोंदणी झाल्यावरच भाविक मंदिराच्या परिसरात येतील. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न देखील आटोक्यात येईल असा विचार केला जात आहे.

पुढील दोनच महिन्यात शिर्डीतमध्ये हायटेक पद्धतीनं दर्शन सुरू करण्यात येणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी अनेकदा मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या निर्णयामुळे भाविकांना फार कमी वेळात दर्शन करता येईल. आणि बाबांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.

Leave a Comment