ट्विटरचा होणार सौदा ?

twitter
मुंबई : लवकरच मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरचा सौदा होण्याची शक्यता असून काही टेक कंपन्यांशी त्याकरिता बोलणीही सुरु असल्याची चर्चा आहे. याबाबत सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गुगल आणि क्लाऊड कॉम्प्यूटिंगमधील सेल्सफोर्स कंपनीशी ट्विटरच्या चर्चा सुरु आहेत.

सध्या ३१३ दशलक्ष ऐवढी ट्विटरच्या अक्टिव्ह युजर्सची संख्या आहे. विक्रीच्या बातमीनंतर ट्विटरच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ट्विटरच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडल्यानंतर विक्रीसंबंधी चर्चा सुरु करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी जॅक डोरसे यांनी ट्विटरच्या सीईओपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर सतत कंपनीच्या उत्पन्नात घट झाल्याने ट्विटरने विक्रीसाठी चर्चा सुरु केली.

Leave a Comment