‘कूलपॅड मॅक्स’वर ११ हजार रुपयांची सूट

coolpad
नवी दिल्ली – कूलपॅड मॅक्स या स्मार्टफोनवर कूलपॅड या चिनी कंपनीने जबरदस्त नवीन ऑफर आणली असून हा फोन कंपनीच्या या नव्या ऑफरमुळे केवळ १३,९९९ रुपयांना अॅमेझॉनच्या वेबसाईटवरून खरेदी करता येईल. २४९९९ रुपये या फोनची मूळ किंमत असून ११ हजार रुपयांची मोठी सूट देण्यात आली. कंपनीच्या भारतातील वर्षपूर्तीनिमित्त ही ऑफर सुरू आहे. मात्र ही ऑफर आजपासून पुढील तीन दिवस सुरू राहील, असे सांगण्यात आले.

फोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, ऑक्टाकोअर स्नॅपड्रगन ६१७चा प्रोसेसर, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज, ४ जीबी रॅम देण्यात आले आहेत. याचा रिअर कॅमेरा १४ मेगाफिक्सलचा तर फ्रन्ट कॅमेरा ५ मेगाफिक्सलचा आहे.

Leave a Comment