१० कोटी ग्राहकसंख्या टप्पा पार करणारे देशातील पहिले ई-व्यापारी संकेतस्थळ

flipkart1
नवी दिल्ली – फ्लिपकार्ट ही देशातील नोंदणीकृत ग्राहकांची संख्या १० कोटीवर पोहोचणारी पहिली ई-व्यापारी कंपनी बनली असून गेल्या एका वर्षात बेंगळूरस्थित कंपनीच्या ग्राहकांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत कंपनीचे नवीन २.५ कोटी ग्राहक जोडले आहेत.

भारतातील लाखो ऑनलाईन ग्राहकांना गुणवत्तापूर्वक उत्पादने आणि सहजपणे कमी किमतीत उत्पादने सादर करण्याचा कंपनीचा छोटासा प्रयत्न आहे. या मैलाच्या दगडामुळे आम्हाला जागतिक पातळीची शॉपिंग डेस्टिनेशन बनण्यासाठी प्रेरणा मिळेल असे फ्लिपकार्ट सहसंस्थापक आणि सीईओ बिन्नी बंसल यांनी सांगितले.
flipkart
भारतातील फ्लिपकार्ट हे प्रमुख ई-व्यापारी संकेतस्थळ असून टायगर ग्लोबल, अस्सेल पार्टनर्स, मॉर्गन स्टॅनली आणि टी रॉव यासारख्या जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांनी कंपनीत कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने आतापर्यंत ३०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक गोळा केली. मिंत्रा, फोनपे, लेट्सबाय यासारख्या कंपन्या आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. याचबरोबर क्युब२६, नेस्टअवे आणि ब्लॅकबक यासारख्या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल रिंचच्या अहवालानुसार, फ्लिपकार्टची देशातील ई-व्यापार क्षेत्रात ४३ टक्के हिस्सेदारी आहे. २०१९पर्यंत ती ४४टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment