केसांच्या विक्रीतून बालाजीला तब्बल १८ कोटींची कमाई

balaji
तिरुपती – तब्बल १७ कोटी ८२ लाख रुपयाची कमाई बालाजी देवस्थानला केसांच्या विक्रीतून झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या केसांच्या लिलावातून ही कमाई देवस्थानला झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

दररोज लाखो भाविक तिरुपती देवस्थानला भेट देतात. यावेळी भाविक दर्शनला जातांना आपले केस बालाजीला अर्पण करतात. या केसांच्या लिलावातून मंदिर ट्रस्टला कोट्यवधी रुपयांचा लाभ होत असतो. यात जुलै महिन्यात ११ कोटी ८८ लाख आणि ऑगस्ट महिण्यात ५ कोटी ९४ लाख रुपयाची कमाई झाल्याची माहिती अध्यक्ष चदालवेदा कृष्णवर्ती आणि कार्यकारी अधिकारी डॉ. डी. संभासीवा राव यांनी दिली. तसेच यावर्षी भाविकांसाठी ११ कोटी २८ लाख रुपयाचे ३९. ३२ लाख लिटर दुध विकत घेणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

Leave a Comment