एसटी महामंडळात १५ हजार जागांसाठी नोकर भरती

state-transport
मुंबई: येत्या काही काळात एसटी महामंडळात नोकरभरती केली जाणार असून या भरतीमध्ये उपलब्ध असलेल्या जांगांची संख्या तब्बल १५ हजार इतकी असणार आहे. यात चालक, वाहकांच्या जागांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असणार आहे. या जागा भरण्यासाठी एसटी महामंडळाने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीशीही बोलणी सुरू केली असून, ही बोलणी पूर्ण होताच नोकरभरतीला सुरूवात होईल.

या आधी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळात भरती झाली आहे. त्यानंतर इकक्या मोठ्या प्रमाणावर महामंडळात भरती झाली नाही. गेल्या दोन वर्षांत एकही जागा भरली न गेल्यामुळे अधिक जागा रिक्तच राहिल्या आहेत. रिक्त जागांवर बेकार तरूणांचा नंबर लागणार असल्याने राज्यातील तरूणांना नोकरीची ही आयतीच संधी उबलब्ध झाली आहे. एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसा एसटी महामंडळासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ साठी १ लाख २६ हजार ११५ जागा मंजुर असून यात १ लाख ४ हजार ३९८ मुष्यबळच सध्या कार्यरत आहे. हे पाहता एकूण २२ हजार २४ हजार जागा रिक्त असून यामध्ये ६ हजार ९०२ ही बढतीतील पदे तर १५ हजार १२२ सरळ सेवेतील परिक्षा घेऊन भरण्यात येणाऱ्या पदांचा समावेश आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चालक, वाहक या पदांसोबतच महामंडळातील इतर पदांसाठीही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यात चालक वाहकांशिवाय कारागिर, सहाय्यक कारगिर या पदांचा समावेश आहे. एसटी महामंडळात सध्या ३६ हजार ७३२ चालक असून आणखी २ हजार ९७७ चालकांची गरज आहे. तर ३४ हजार ८0७ वाहक कार्यरत असून आणखी ३ हजार ९६३ वाहकाची तातडीची आवश्यकता महामंडळाला आहे . कारागिर, सहाय्यक कारागिर यांचीही ५ हजारपेक्षा जास्त पदे तर हेल्परसह वर्ग-४ मधील अन्य काही पदेही रिक्त असल्याचीही सूत्रांची माहिती आहे. नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी काम करणाऱ्या कंपनीशी बोलणी पूर्ण होताच जाहिरात काढली जाईल असेही सुत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

4 thoughts on “एसटी महामंडळात १५ हजार जागांसाठी नोकर भरती”

Leave a Comment