पाहता पाहता दिसेनासा होणारा अनोखा रस्ता

frans
फ्रान्समध्ये गेलात तर एका अनोख्या रस्त्याला भेट देण्यास विसरू नका. हा रस्ता दिवसातून दोन वेळा दोन तासांसाठी खुला असतो व पाहता पाहता पाण्यात दिसेनासा होतो. दिवसातल्या ठराविक दोन वेळा सोडल्या तर बाकी पूर्ण वेळ हा रस्ता भरतीच्या पाण्यात बुडालेलाच असतो. मेन लँड ते नॉइरमाँटियर बेटाला जोडणारा हा रस्ता पॅसेज टू गोईस म्हणजे चपला बूट ओल्या करत पार करायचा रस्ता या नावाने ओळखला जातो.

हा रस्ता साडेचार किलोमीटर लांबीचा आहे व १७०१ साली तो प्रथमच नकाशावर दाखविला गेला. फ्रान्स अटलांटिक किनार्‍यावर हा रस्ता बांधला गेला आहे मात्र भरती असताना तो पार करणे हे फारच खतरनाक असते असा अनुभव आहे. दिवसातून दोन वेळा दोन तासांसाठी हा रस्ता अगदी स्वच्छ दिसतो मात्र पाहतापाहता तो कधीही पाण्याखाली जाऊ शकतो. अचानकच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाण्याची पातळी वाढू लागते व या रस्त्याला पोटात घेते. येथे पाण्याची खोली ४ ते १२ फुटांपर्यंत असते. दिवसातून एखादा अपघात या रस्त्यावर होतोच असेही समजते.

फार काळापूर्वी मुख्य भूमीतून या बेटावर जाण्यासाठी बोटींचा वापर होत असे. कालांतराने या खाडीत गाळ जमू लागला त्यामुळे पक्का रस्ता बांधला गेला. १८४० सालानंतर कार व घोडे वाहतूक सुरू झाली.१९८६ साली या रस्त्यांचा वापर अनोख्या रेससाठी होऊ लागला. १९९९ साली या रस्त्याचा वापर फ्रान्सच्या जगप्रसिद्ध टूर डी फ्रान्स सायकल रेससाठीही केला गेला होता.

Leave a Comment