आयफोन सेव्हन तस्कराला अटक

phonphon
दिल्ली- भारतात लाँच होण्याअगोदरच अॅपलच्या आयफोनची तस्करी करून ते भारतात आणणार्‍या व्यक्तीला दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पकडण्यात आले असून त्याच्याकडून २६ आयफोन सेव्हन तर ७ सेव्हनप्लस फोन जप्त करण्यात आले आहेत. हा प्रवासी दिल्लीचा रहिवासी असून त्याने हाँगकाँगमधून हे फोन आणले आहेत. दिल्लीत हे फोन तो जादा किमतीला विकणार होता असेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार हा तरूण जेट एअरवेजने हाँगकाँगहून दिल्लीत आला तेव्हा त्याला ग्रीन चॅनलमध्येच संशयावरून अडविले गेले व त्याच्याकडच्या सामानाचे स्कॅनिंग केले गेले तेव्हा त्याने आयफोन तस्करी करून आणल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याचे मागचे रेकाडॅ तपासले तेव्हा त्याने गतवर्षी आयफोन सिक्स याप्रकारेच भारतात लाँच होण्यापूर्वी परदेशातून आणून भारतात जादा किंमतीला विकल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment