मुलानो आता खेळा नमो सॉफ्ट टॉयसोबत

modi-toy
पतंप्रधान नरेंद्र मोदींची जादू ही मोठ्यांच्या पुरती मर्यादित होती. पण आता मोदींची जादू लहान मुलांवर देखील झाली आहे. सध्या बाजारात लहान मुलांकरिता खास नमो सॉफ्ट टॉय नामक खेळणी विक्रीस आली आहेत. या खेळण्याचे बाजारात प्रचंड वेड असून त्याची ऑनलाईन विक्री सुरू आहे. ही खेळणी टीकल्स या कंपनीने बनवली आहे. ही खेळणी ३ ते ६ वर्ष वयोगटाकरता उपयुक्त आहेत.

मुलांना या मोहक मऊ खेळण्यामुळे आनंद मिळणार आहे असे या कंपनीतर्फे सांगण्यात आले. फ्लिपकार्टद्वारे नरेंद्र मोदी रुपातील १५ इंची खेळणे ९५८ रूपयांना मिळत आहे. तर, स्नॅपडील नमो सॉफ्ट टॉयची किंमत १ हजार ३६५ आहे. यामध्ये विशेष म्हणजे, या खेळण्यामुळे मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्यास तसेच एकाग्रता वाढण्यास मदत होण्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment