महागाईचा भडका: जगण्यासोबत मरणे ही झाले महाग

vat
मुंबई: नुकताच व्हॅट दरात एक टक्का वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे महागाईने पिचलेल्या जनतेवर पून्हा एकदा दरवाढीचा बोजा चढणार आहे. चड्डी-बनियन, घर, गाडी, मिठाई, भाज्या, इतकेच नव्हे तर, तिरडीचे बांबूही आता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे महागणार आहेत. दरम्यान, हा निर्णय सरकारसाठी फायदेशीर राहणार असून, सरकारच्या तिजोरीतील खडखडाट कमी करण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतल्याचे सरकारचे म्हणने आहे.

दरम्यान, आपल्या निर्णयाचे सरकारने जोरदार समर्थन केले असून, बिहार, गुजरातमध्ये १५ टक्के, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, पश्‍चिम बंगाल आणि राजस्थानात साडेचौदा टक्के व्हॅट आकारला जातो. त्यामुळे करवाढ केली तरी महाराष्ट्रातील व्हॅट कमीच असल्याचा सरकारचा दावा आहे. यापूर्वी आकारण्यात येणारा व्हॅट दर साडेबारा टक्के होता. तो आता साडेतेरा टक्के तर, निम्न कराचा दर साडेपाच टक्क्यांहून सहाटक्क्यांवर जाणार आहे.
व्हॅटच्या दरवाढीचा परिणाम अनेक पातळ्यांवर पहायला मिळेल. उदा. गाडीवरील व्हॅटदर वाढलेला असेल त्याचसोबत पेट्रोच्या दरावरीलही व्हॅटदर वाढलेला असेल. त्यामुळे जनतेच्या खिशावर अधिक बोजा पढून महागाई वाढल्याचे दिसेल. सरकारने पेट्रोलच्या विक्रीकरात दीड रूपयांची वाढ केली आहे.

शेती अवजारे, दिव्यांग व्यक्तींसाठीची साधने, पुस्तके, जनावरे, गहू, ज्वारी, तांदूळ व त्याचे पीठ, डायलिसीस व कॅन्सरवरील औषधे, दूध, जैविक खते, साखर, मिरची, हळद, नारळ, सोलापुरी चादर, टॉवेल, अगरबत्ती आदी वस्तूंच्या किमती जैसे थे असणार आहेत. तर, कपड्यांपासून, पेट्रोल, कडधान्य, दूध सर्वकाही महाग होणार असल्याने सर्वसामान्य जनता सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहे. दरम्यान, तिजोरीत खडखडाट असल्याचे तुनतूने सरकार नेहमीच वाजवताना दिसते. सत्तेवर आल्यापासून सरकारचे हेच सांगणे आहे की, अगोदरच्या सरकारने तिजोरीत काहीच ठेवले नाही. त्यामुळे तिजोरीत भर टाकण्यासाठी सकरारची ही नवी शक्कल यशस्वी ठरणार का या बाबत सर्वसामान्यांमध्ये नाराजी तर, मंत्रीमंडळात उत्सुकत आहे.

Leave a Comment