माशांच्या खवल्यापासून वीज निर्मितीत यश

fish
समुद्र, नद्यातून प्रचंड संख्येने असणारे मासे वीज निर्मितीसाठी उपयुक्त ठरले आहेत. माशांच्या खवल्यांपासून वीज निर्मिती करण्याचे प्राथमिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. खवल्यांपासून निर्माण होणारी ही उर्जा पेसमेकर, इन्शुलिन पंप अशा प्रकारच्या मेडिकल उपकरणांतून वापरणे शक्य असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातील प्रो. दीपांकर मंडदळ यांनी हे प्रयोग केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार माशांचे हे खवले मासे शिजवताना साफ केले जातात व ते फेकून दिले जातात. या खवल्यांत असणारे तंतू फार महत्त्वाचे असतात. या खवल्यात पायजोइलेक्ट्रीक क्षमता असलेले पदार्थ असतात. त्यावर दाब दिला गेला तर त्यातून उर्जा निर्माण होते. प्रो.दीपांकर यांनी हे खवले अॅसिडमध्ये टाकून पारदर्शक व लवचिक बनविले. नंतर त्याला विशिष्ठप्रकारे प्लॅस्टीक लॅमिनेट करून ते गोल्ड इलेक्ट्रोडने जोडले तेव्हा त्यातून वीज निर्मिती होत असल्याचे दिसून आले. ही वीज पर्यावरणपूरक व प्रदूषण रहित आहे. आणि छोट्या उपकरणांसाठी ती वापरता येईल असे दीपांकर यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment