येथे आहे जगातील सर्वात लहान चित्रपटगृह

theater
बलाईचा – ऑस्ट्रेलियातील बलाईचा या शहरात जगातील सर्वात लहान चित्रपटगृह असून या चित्रपटगृहात एकाच वेळी अवघे ८ जण चित्रपट पाहू शकतात. या चित्रपटगृहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात येणार आहे. चित्रपट, नाटक आणि संगीत यासाठी हे चित्रपटगृह विनामुल्य आहे. एका रांगेत बसून एकाच वेळी येथे ८ जण चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. जगातील सर्वात लहान चित्रपटगृह असणाऱ्या या चित्रपटगृहाविषयी अनेकाच्या मनात उत्सुकता आहे.

Leave a Comment