व्हॉट्सअॅपने आणले सेल्फीसाठी नवीन फिचर्स

whatsapp
सातत्याने नवनवे फीचर्स लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप अपडेट करते. आता आणखी नवे फीचर्स व्हॉट्सअॅपने अॅड अपडेट केले आहेत.

लेटेस्ट बिटा व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅपने अपडेट आणले असून, हे अपडेट फोटोशी संबंधित आहे. या अपडेटमुळे फोटो आणि सुंदर बनवता येतात. हे फीचर स्नॅपचॅट किंवा अन्य अॅपमध्ये यापूर्वीच उपलब्ध आहेत. सध्या हे अपडेट बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. मात्र ते लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. ऑफिशिअल रिलीजआधाची हे अॅप तुम्ही वापरु शकता.

तुम्ही एखादा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपवर पाठवणार असाल, तर फोटो काढल्यानंतर तुम्हाला फोटोवर क्रॉपसह अन्य पर्याय दिसतील. यामध्ये एक स्मायली, दुसऱ्यामध्ये T आणि तिसऱ्यामध्ये पेन्सिल दिसेल. तुम्ही स्मायलीवाल्या पर्यायावर क्लिक केल्यास, खूप साऱ्या स्माईली दिसतील. तुम्ही फोटोसोबत कोणतीही स्माईली अॅड करु शकता. तुम्ही जी स्मायली निवडाल, ती फोटोवर येईल आणि तुम्हाला हवी तिथे ती नेऊन ठेवू शकता.

दुसरी पर्याय -T : T म्हणजे टेक्स्ट. म्हणजेच तुम्ही फोटोवर काहीही लिहू शकता. T वर टॅप केल्यानंतर की बोर्ड समोर येईल. उजव्या कोपऱ्यात कलरबार दिसेल, त्यापैकी कलर तुम्ही अक्षरांसाठी निवडून शकता. टेक्स्ट लिहिल्यानंतर तुम्ही एण्टर किंवा ओके केल्यानंतर, ती अक्षरं फोटोवर दिसतील. तुम्ही हे सुद्धा फोटोवर कुठेही मूव्ह करु शकता.

तिसरा पर्याय – पेन्सिल या पर्यायाचा वापर तुम्ही डूडलसाठी करु शकता. फोटो आणखी रंजक करण्यासाठी या पर्यायचा वापर करु शकता. या फिचर्सशिवाय व्हॉट्सअपने फ्रंट फ्लॅश हे फिचरही आणलं आहे. अंधुक प्रकाशात चांगला सेल्फी घेण्यासाठी फ्रंट फ्लॅश हे फीचर अॅड केलं आहे. सेल्फी घेताना स्क्रीन पांढरी होईल, ज्यामुळे फोटो काढण्यासाठी प्रकाश मिळेल. हे अपडेट सध्या बिटा व्हर्जन २.१६.२६४ वर उपलब्ध आहे. जर तुम्ही व्हॉट्सअपचे बिटा प्रोग्राम साईनअप केले असेल, तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन अपडेट करु शकता.

Leave a Comment