बीएसएनएल देत आहे ९ रुपये मासिक शुल्कात अनलिमिटेड इंटरनेट

bsnl
जयपूर : रिलायन्स जिओ बाजारात दाखल झाल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपन्यांची त्रेधातिरपीट झाली आहे. आता इतरही कंपन्या मार्केटमधले आपले शेअर्स वाचवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. याच दरम्यान बीएसएनलनेही आपला नवीन डाटा प्लान ग्राहकांसमोर सादर केला आहे. बीएसएनएलने केवळ ९ रुपये मासिक शुल्कात अनलिमिटेड ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. एक जीबी डेटा वापर होईपर्यंत स्पीड २ एमबीपीएस राहील. यानंतर एक एमबीपीएस स्पीड असेल. शुक्रवारपासून ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. बीएसएनएलही कॉल फ्री सुविधा देत असल्यामुळे ब्रॉडबँड युझर्सच्या संख्येतही वाढ झाली आहे.

Leave a Comment