व्हॉटसअॅपवर लवकरच डुडलिंगची सुविधा

whats
व्हॉटसअपचे युजर दिवसेनदिवस वाढत चालल्याने अनेक सुविधा दिल्या जात आहेत. फोटोखाली कॅप्शन पोस्ट करण्याची सुविधा अशीच लोकप्रिय ठरली आहे व त्यामुळे युजर संख्याही वाढली आहे. यातच भर म्हणून आता लवकरच युजरना फोटो डुडलिंग करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.

डुडलिंग अपडेटमुळे पोस्ट केलेल्या फोटेावर चित्र काढणे, लिहिणे, मोठी इमोजी वापरणे असे पर्याय मिळणार आहेत. त्यासाठी बिटा व्हर्जनवर चाचण्याही सुरू झाल्या आहेत. पुढच्या कांही दिवसांत युजर्ससाठी फोटेात केले गेलेले बदल डिलिट करण्याची सुविधाही दिली जाणार आहे. यासाठी युजरला टॅप करून रिसायकल आयकॉनवर जाऊन फोटो डिलिट करता येतील असे समजते. अँड्राईडबरोबरच आयस्टोअरवर हे व्हर्जन उपलब्ध केले जात आहे.

Leave a Comment