‘इस्रो’च्या ‘इन्सॅट-३डीआर’चे यशस्वी प्रक्षेपण

isro
नवी दिल्ली – जीएसएलव्ही एफ-०५ प्रक्षेपकाच्या साह्याने इन्सॅट-३डीआर या उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाचा उपयोग हवामानाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी होणार आहे. या उपग्रहाचे पूर्वनियोजित प्रक्षेपण गुरुवारी दुपारी चार वाजून १० मिनिटांनी होणार होते. पण ते चार वाजून ५० मिनिटांपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते.

२२११ किलोग्रॅम इतके इन्सॅट-३डीआर या उपग्रहाचे वजन आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या साह्याने ते निर्धारित कक्षेपर्यंत पाठविण्यात आले. या उपग्रहाचे आयुष्य आठ वर्षे इतके असून, हवामानाचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. संशोधन मोहिमा आणि भूस्तरिय संशोधनासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

Leave a Comment