बाजारात आली आहेत खोटी १० रुपयांची नाणी

coin
नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच सरकारने १० रुपयांचे नाणे बंद केले असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान आरबीआयने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून ही नाणी बंद न केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता एक नवीन समस्या निर्माण झाली असून सध्या बाजारात १० रुपयांची खोटी नाणी आली आहेत.
coin1
ही नाणी खोटी आहेत की खरी ओळखण्यासाठी खऱ्या नाण्यावर रुपयाचे चिन्ह आहे, तर खोट्या नाण्यावर फक्त १० असा आकडा लिहिला आहे.
coin2
खऱ्या नाण्याच्या वरच्या बाजूला १० पट्ट्या आहेत तर खोट्या नाण्यावर १५ पट्ट्या आहेत.
coin3
खऱ्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भारत आणि इंडिया वेगवेगळे लिहिले आहे तर खोट्या नाण्यावर दोन्ही अक्षरे एकत्र लिहिली आहेत.

त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक एक दुसऱ्यांशी १० रुपयांच्या नाण्यांची देवाणघेवाण बंद केली आहे. या दरम्यान ही निव्वळ अफवा असल्याचे आरबीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान असे ही म्हटले जात आहे की कोणी माथेफिरूने १० रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा पसरवली आहे. या अफवेची वाच्चता हळूहळू शहरभर पसरली.

Leave a Comment