कॅन्डेन्झा- १२ जीबी रॅमचा सुपरफोन

cadenza
ट्यूरिंग रोबोटिक्स इंडस्ट्रीने स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती करत नवा सुपरफोन बाजारात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. न्यूजलेटर मध्ये या शानदार फोनची स्पेसिफिकेशन दिली गेली आहेत. कॅन्डेन्झा असे या फोनचे नामकरण केले गेले आहे. अनेक बाबतीत हा फोन रेकार्ड नोंदवेल असा कंपनीचा दावा आहे. या फोनसाठी दिली जात असलेली फिचर्स आत्तापर्यंत कोणत्याच स्मार्टफोनसाठी दिली गेलेली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार या फोनसाठी १२ जीबी रॅम दिली गेली आहे. तसेच ५.८ इंची स्क्रीन, २ क्वालकॉम स्नॅप ड्रॅगन ८३० प्रोसेसर, ६० एमपीचा ६ के स्क्वाड रिअर कॅमेरा, ट्रीपल लेन्स टी १.२ फिचरसह दिला जाणार आहे.२० एमपीचा ड्युअल फ्रंट कॅमेरा, १ टीबी स्टोरेज, स्वार्ड फिश ओएस, ऑन/ऑफ व्हॉईस फिचर, ४ जी एलटीई चार नॅनो सिम सपोर्ट, १०० डब्ल्यू एच ट्रीपल सोर्ससह २४०० एमएएच ग्रॅफने सुपरकपॅसिटर बॅटरी, १६०० एमएएच ली आओएन बॅटरी व हायड्रोजन फ्यूएल सेल अशी त्याची अन्य फिचर्स असतील. विशेष म्हणजे स्नॅप ड्रॅगन ८३० प्रोसेसर अद्यापी बाजारात आलेला नाही.

1 thought on “कॅन्डेन्झा- १२ जीबी रॅमचा सुपरफोन”

Leave a Comment