गुजराथेत सापडला नवीन रक्तगट

blood-group
सुरत येथील डॉक्टरांना एका युवकाचा रक्तगट पाहून हैराण होण्याची वेळ आली आहे. हा रक्तगट कुठल्याच रक्तगटाशी मॅच झालेला नाही व जगातही या रक्तगटाचे कुणी असेल याची खात्री नाही असे ही रक्त तपासणी करणारे डॉक्टर सन्मुख जोशी व किंजल मेंडपुरा यांनी सागितले. या रक्ताची सँपल जागतिक आरोग्य संघटनेकडे पाठविली गेली असून त्यांनीही हा रक्तगट नवीनच असल्याचे सर्टिफाय केले आहे. सध्या या रक्तगटाला आयएनआरए असे नांव दिले गेले आहे. त्यातील पहिली दोन अक्षरे इंडिया साठी तर दुसरी दोन अक्षरे संबंधित व्यक्तीची आद्याक्षरे आहेत.

या रक्तगटावर अधिक संशोधन केले जात आहे. असे मानले जाते की जगात असे आत्तापर्यंत सात रेअर रक्तगट सापडले आहेत. हे रक्तगट कुठल्याच दुसर्‍या रक्तगटाला मॅच होत नाहीत. त्यांना कोलटोल(सीओएलटीओएल) असे म्हटले जाते. गुजराथेत सापडलेला रक्तगट या सात मधील नाही. मात्र या सात रक्तगटातील एक भारतात आहे. त्याला बाँम्बे ब्लडग्रुप असे म्हटले जाते. सात हजारात एखाद्याचाच असा रक्तगट असतो. नव्या रक्तगटाच्या व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य सदस्यंाचे रक्तगट तपासणीचे काम सुरू झाले असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले.

दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत तसेच रक्त घेऊही शकत नाहीत. दुर्देवाने त्यांना कांही कारणाने रक्त द्यायची वेळ आलीच तर ते अत्यंत अडचणीचे होते.

Leave a Comment