एलआयसी पॉलिसीधारकांना देणार वन टाईम बोनस

lic
एलआयसीने त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्त सर्व पॉलिसीधारकांना वन टाईम बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यानुसार १ हजार रूपयांच्या अॅशुअर्ड रकमेवर पाच ते साठ रूपये बोनस दिला जाणार आहे. एलआयसीचे २९ कोटी वैयक्तिक पॉलीसीधारक तसेच १२ लाख ग्रुप पॉलिसीधारक यांना या बोनसला लाभ मिळणार आहे.

एलआयसीचे अध्यक्ष एस.के.रॉय म्हणाले, ग्राहकाची पॉलिसी किती जुनी आहे त्यावर बोनसची रक्कम ठरविली जाणार आहे. मॅच्युरिटीच्या जवळ असलेल्या पॉलिसींना जादा बोनस मिळेल तर नवीन पॉलिसींना कमी बोनस दिला जाईल. १ लाख रूपयांच्या पॉलिसीवर कमाल ६ हजार रूपये बोनस दिला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेनंतर सर्वाधिक नफा कमावणारी एलआयसी ही सरकारी कंपनी आहे. गतवर्षी एलआयसीने ४० हजार कोटींचा नफा मिळविला आहे. ब्रिटन, ओमान, बहारीन, सौदी अरेबियासह ११ देशात एलआयसीची कार्यालये आहेत.

Leave a Comment