जिओत काय मिळणार आहे तुम्हाला

reliance
नवी दिल्ली – आज रिलायन्सने आपल्या जिओ फोर जी सेवेचा प्रारंभ केल्यानंतर ग्राहकांसाठी आकर्षक सवलती जाहीर केल्या असून रिलायन्स जीओत ११ नवे ॲप असून यातील काही ॲप पूर्णता: मोफत आहेत. यापैकी व्हिडीओ कॉलिंग, ऑन डिमांड व्हिडीओ यांसारख्या सेवा ग्राहकांना दिल्या जाणार आहेत.

यामध्ये कायमस्वरुपी आऊटगोईंग कॉलिंग मोफत दिले असून एसटीडी, लोकल कॉल कायमस्वरुपी मोफत दिले आहेत,तर कायमस्वरुपी रोमिंग फ्री तसेच सण, उत्सवांच्या दिवशीही मेसेजच्या दरात वाढ होणार नाही. विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के वाढीव डेटा, डिसेंबरपर्यंत डेटा मोफत, त्यानंतर केवळ ५० रुपयात १जीबी ४जी डेटा मिळणार आहे. ॲपच्या माध्यमातून ३०० पेक्षा अधिक चॅनेल्सचा लाभ घेता येणार असून ६ हजारपेक्षा अधिक चित्रपट पाहता येणार आहेत. तर १० दशलक्ष गाणी ऐकता येणार आहेत.

Leave a Comment