५१ रुपयात एअरटेल देणार वर्षभरासाठी ३ जी/४जी इंटरनेट

airtel
मुंबई : एअरटेलने रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे. भारती एअरटेलने त्यांच्या ४जी आणि ३जी इंटरनेट डेटा प्लॅनच्या दरांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत कपात केली असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभरासाठी ५१रुपयांमध्ये १जीबी इंटरनेट मिळणार आहे.

एअरटेलच्या ग्राहकांना या स्कीमसाठी पहिले १४९८ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. हे रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना २८ दिवसांसाठी १जीबी ३जी/४जी इंटरनेट डेटा मिळणार आहे. हे 28 दिवस किंवा १जीबी इंटरनेट वापरल्यानंतर एअरटेलच्या ग्राहकांना ५१ रुपयांमध्ये ३जी/४जी इंटरनेट डेटा मिळणार आहे. मुख्य म्हणजे याची व्हॅलिडिटी १२ महिने असणार आहे. १जीबी डेटा संपला तरी तुम्ही कितीही वेळा ५१ रुपयांचे रिफील करू शकता. एअरटेलची ही नवी ऑफर ३१ ऑगस्ट २०१६ पासून लॉन्च होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Leave a Comment