अनिवासी भारतीयाने शोधला स्तनाच्या कर्करोगावर रामबाण उपचार

breast-cancer
लंडन – ब्रिटनमध्ये राहणार्‍या अवघ्या १६ वर्षीय भारतीय मुलाने जगभरातील औषधानांही आजवर प्रतिसाद न देणार्‍या स्तनाच्या अतिशय घातक कर्करोगावर रामबाण औषधाचा शोध लावला असून त्याच्या या शोधकार्यामुळे विदेशात पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे.

या भारतीय मुलाचे नाव क्रतिन नित्यनंदम असे असून, ब्रिटनमध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत वास्तव्याला आहे. माझ्या उपचारपद्धतीमुळे आजवर औषधांना प्रतिसाद न देणारा ‘ट्रिपल निगेटिव्ह’ स्तनाचा कर्करोग निश्‍चितच प्रतिसाद देईल, असा विश्‍वास त्याने व्यक्त केला आहे.

‘ट्रिपल निगेटिव्ह’ या प्रकारातील स्तनाचा कर्करोग कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही. शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरेपी या तीन माध्यमातूनच त्यावर उपचार केला जातो. पण, यातही रुग्णाच्या जिवंत राहण्याची शक्यता कमीच असते.

आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना क्रतिन म्हणाला की, अतिशय जटिल अशा या स्तनाच्या कर्करोगाचा रुग्ण उपचारांना प्रतिसाद देऊ शकेल, अशी प्रणाली मी विकसित केली आहे. संडे टेलिग्राफ या आघाडीच्या वृत्तपत्राने त्याचे संशोधन प्रकाशित केले आहे.

स्तनाचा कर्करोगात आयडी-४ हा घटक स्टीम कोशिका बंद करीत असतो. या आयडी-४ घटकालाच निर्माण करणार्‍या जिन्स रोखण्यात या संशोधनामुळे यश मिळणार आहे, असे तो म्हणाला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment