स्वस्त झाला सॅमसंगचा ‘जे ५’

samsung
नवी दिल्ली : मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी स्मार्टफोनवर चक्क १० हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे. मात्र, ही सूट एक्सचेंज ऑफर अंतर्गत आहे. तर, ‘सॅमसंग डेज’ या खास ऑफरनुसार फ्लिपकार्टवर सॅमसंग जे५ फोनवर १३०० रूपये इतकी सुट सूरू आहे. सॅमसंग जे५ ची मूळ किंमत १३ हजार ९०० असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एक्चेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी फ्लिपकार्टवर जून्या फोनची माहिती नोंदविणे ग्राहकाला आवश्यक आहे. फोनची माहिती नोंदवताच फोनची कमाल किंमत ग्राहकाला दाखविण्यात येईल. त्यानंतर ग्राहकाने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. दरम्यान, स्मार्टफोनच्या दूनियेतही दररोज नवनवे पर्याय ग्राहकाला उपलब्ध आहेत. याचा फायदा घेत ग्राहक दररोज नवनव्या पर्यायाकडे वळतो आहे. त्यामुळे स्मार्टफोन कंपन्यांची ही मोठी डोकेदूखी बनली असून, असलेला ग्राहक टीकवून कसा ठेवायचा याबाबत स्मार्टफोन कंपन्या नवनव्या पर्यायांच्या शोधात आहेत. या कंपन्यांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या ऑफर्स या पर्यायांचाच भाग आहेत.

सॅमसंगच्या जे५ या स्मार्टफोनला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो याबाबत स्मार्टफोनच्या दूनियेत प्रचंड उत्सूकता आहे. मात्र, या स्मार्टफोनला ग्राहक नक्कीच चांगला प्रतिसाद देतील असा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment