या द्रोणाचार्यांनी घर ठेऊन बनविलेल्या अकॅडमीने भारताला मिळवून दिली दोन पदके

pullela-gopichand
नवी दिल्ली – भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनातच लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये सायना नेहवालने गोपीचंद कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर शुक्रवारी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची नवीन फुलराणी पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक जिंकून देशाची शान वाढविली आहे. याबाबत पुलेला गोपीचंद यांना या गोष्टीचा अभिमान आहे की, त्यांच्या मार्गदर्शनात देशाला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके मिळाली. यावेळी विशेष म्हणजे आपले राहते घर गहाण ठेऊन गोपीचंद यांनी अकॅडमी खोलली व भारताला दोन ऑलिम्पिक मेडल मिळवून दिली.

दरम्यान १६ नोव्हेंबर १९७३ रोजी आंध्रप्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यात नगन्दला येथे जन्मलेल्या पुलेला गोपीचंद यांनी वयाच्या १० व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करणारे गोपीचंद भारतातील प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहे. २००१ मध्ये चीनच्या चेन होंगसा फायनलमध्ये गोपीचंद यांनी १५-१२,१५-६ असे हरवून ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चँपियनशिप जिंकून एक नवीन इतिहास रचला होता. त्यापूर्वी ही कामगिरी केवळ स्टार बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण (१९८०) यांनीच केली होती. त्यानंतर २००१ मध्ये गोपीचंद यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यानंतर दुखापतीने त्यांच्या खेळावर परिणाम झाला व त्यांनी राष्ट्रीय स्तरावर केळणे बंद केले.

गोपीचंद यांनी त्यानंतर आपली बॅडमिंटन अकॅडमी खोलली व प्रशिक्षकाच्या रुपात अनेक खेळाडूंना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला. अकॅडमी सुरू करण्यासाठी गोपीचंद यांना आपल्या राहते घरही गहाण ठेवावे लागले होते. दरम्यान आंध्रप्रदेश सरकारने गोपीचंद यांना अकॅडमी खोलण्यासाठी जमीन दिली होती. परंतु प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र त्यांनी हार न मानता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले घर गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. वर्ष २००५ मध्ये पद्मश्री आणि २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गोपीचंद यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. गोपीचंद यांनी केवळ सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनाच नाही तर श्रीकांत किदांबी, पी कश्यप, गुरुसाई दत्त, तरुण कोना या सारख्या अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. ५ जून २००२ रोजी गोपीचंद यांनी ऑलिम्पियन बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. लक्ष्मी यांच्याशी विवाह केला.

Leave a Comment