दहशतवाद संबन्धित २ लाख ३५ हजार अकाऊंट्स ट्विटरकडून बंद

twitter
मुंबई : दहशतवादावरील संवादमुळे ट्विटरने २ लाख ३५ हजार अकाऊंट्स बंद केली आहेत. इसिसवर आधारीत पोस्ट्सचा समावेश या संवादामध्ये होता त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून दहशतवादावर बोलले जात असून यामध्ये प्रामुख्याने इस्लामिक राज्यांचा समावेश आहे. दहशतवादी हल्यांच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय गंभीर बाब असल्यामुळे अशाप्रकारे दहशतवादी संवाद होत असलेले ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment