लवकरच बाजारात दाखल होणार एचटीसीची नेक्सस सीरिज

htc
मुंबई : लवकरच दोन स्मार्टफोन एचटीसी ही मोबाईल उत्पादक कंपनी लॉन्च करणार असून एचटीसी सेल्फिश आणि एचटीसी मार्लीन असे या स्मार्टफोन्सचे नाव असून काही वेबसाईट्सवर या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत.

या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स जवळपास सारखेच असतील. एचटीसी नेक्सस सेल्फिशच्या तुलनेत मार्लीनच्या डिस्प्लेचा आकार कमी असेल. एचटीसी नेक्ससमध्ये १४४०×२५६० पिक्सेल रिझॉल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. सेल्फिशमध्ये ५.५ इंचाचा QHD डिस्प्ले तर मार्लीनमध्ये ४.५ इंचाचा QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० क्वाड कोअर प्रोसेसर आणि अँड्रॉईड नोगट ७.० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी, १३ मेगापिक्सेलचा रिअर तर ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment