गो एअर या वाडिया ग्रुपच्या खासगी विमान कंपनीला आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली असून पुढच्या वर्षीपासून ही उड्डाणे सुरू होतील असे समजते. इराण, उजबेकिस्तान, कजाकिस्तान, अजरबेजान, सौदी, चीन, व्हिएतनाम या देशांत ही कंपनी आपली सेवा देऊ शकेल. राष्ट्रमंडळाच्या स्वतंत्र देशात अशी उड्डाण परवानगी मिळालेली गोएअर ही पहिलीच खासगी विमान कंपनी असल्याचे सांगितले जात आहे.
गो एअर ला आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार कांही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबतचे नियम शिथिल केले आहेत. त्यानंतर दोन महिन्यात गो एअरला परदेशी विमान उड्डाणांसाठी परवानगी दिली गेली आहे. ही उड्डाणे उन्हाळा सीझनपासून सुरू होतील. मार्चचा पहिला रविवार ते आक्टोबरचा शेवटचा शनिवार असा हा सीझन असतो. यापूर्वी इंडिगो व स्पाईसजेटलाही आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी दिली गेली आहे.