अवघ्या २ कोटी रूपयांत अख्ख्या गावाची मालकी

creek
अमेरिकेतील केबिन क्रिक हे गाव विक्रीसाठी उपलब्ध असून या संपूर्ण गावाची किंमत फक्त साडेतीन लाख डॉलर्स म्हणजे सव्वादोन कोटी रूपये आहे. गाव विक्रीला असल्याची जाहिरात गावाच्या मालकाने अमेरिकन वेबसाईट वर दिली आहे. हे गाव अमेरिकेत भुतांचे गांव म्हणून कुख्यात आहे. त्यामुळे ज्यांना भुतांची अजिबात भीती वाटत नाही त्यांना खरेदीसाठी ही सुवर्णसंधीच आहे.

creek1
या गावात आठ खोल्यांचे मोटल, पेट्रोलपंप, कॅफे, दोन घरे व प्रायव्हेट शूटिंग रेंज आहे. गावात गुन्हे घडू नयेत म्हणून सुरक्षेची चोख व्यवस्था आहे. २ हेक्टरच्या या परिसरात १६ सीसीटिव्ही लावले गेले आहेत. गावाचा मालक जेम्स जॉन्सनच्या म्हणण्यानुसार जाहिरात आल्यापासून अनेकांनी हे गांव खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे, कांही जण प्रत्यक्ष भेट देऊनही गेले आहेत. डेनेव्हरपासून ९० किमीवर असणार्‍या या गावाची माहिती १९७० पर्यंत फारशा लोकांना नव्हती. या वर्षी येथे एक खून झाला व तो भुतांनीच केला असा समज पसरल्यानंतर हे गाव भुतांचे गांव म्हणून प्रसिद्धीस आले आहे.

Leave a Comment