स्वाइपचा नवा बजेट स्मार्टफोन लाँच

swipe
मुंबई: आपला नवा कनेक्ट प्लस हा बजेट स्मार्टफोन स्वाइप टेक्नॉलॉजीने लाँच केला असून सध्या ब्लॅक रंगाच्या वॅरिएंटसोबत हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असून, तुम्ही तो फ्लिपकार्टवरून ४९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

५ इंचाचा डिस्प्ले या नव्या स्मार्टफोनमध्ये असून, त्याचे रिझॉल्यूशन १२८० x७२० पिक्सेल आहे. तसेच यामध्ये १.२GHz क्वार्डकोर प्रोसेसरसोबतच २ GB रॅम असेल. इंटरनल स्टोरेजसाठी यामध्ये १६ जीबीची मेमरी देण्यात आली असून, ती ३२जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय, या स्मार्टफोमध्ये १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्यूअल सिमसोबतच अॅन्ड्रॉइड ५.१ लॉलीपॉपवर काम करतो. कनेक्टिविटीसाठी यामध्ये ३जी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 3000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment