एमटीडीसीच्या मुंबई दर्शन सेवेचे उद्घाटन

ntdc
मुंबई : अगदी स्वस्तात आणि बेस्टच्या वातानुकुलित बसच्या माध्यमातून मुंबई दर्शनची सुविधा महाराष्ट्र पर्यंटन विकास महामंडळाने उपलब्ध करुन दिली असून मात्र वारंवार बंद पडणा-या वातानुकुलित किंगलॉग बसेसच मुंबई दर्शनाकरता देण्यात आल्यामुळे पर्यंटकांचे मुंबई दर्शन विनासायास पार पडेल अशी आशा करुया.
cm
मुख्यमत्र्यांनी सीएसटी स्थानकाच्या बाहेर बेस्ट बसच्या आवारात एमटीडीसीच्या मुंबई दर्शन सेवेचे उद्घाटन केले. स्वतः मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री आणि अधिकाऱ्यांनी बसमधून उद्घाटनानंतर प्रवास केला. या सेवेमध्ये बसचे दोन मार्ग आखण्यात आले आहेत.

या मुंबई दर्शन बसचे तिकीट ऑनलाईन बुक करता येणार आहे. माणशी ४९९ आणि ७२५ रुपये असा हा तिकीट दर आहे. मात्र मुंबई दर्शनासाठी बेस्टने ज्या बसेस निवडल्या आहेत त्यावर मात्र शंका व्यक्त केली जात आहे. कारण वादग्रस्त आणि खार्चिक ठरलेल्या किंगलॉग बसेस बेस्टनं मुंबई दर्शनासाठी दिल्या आहेत. तेव्हा या वातानुकिलित बसेस पर्यंटकांचा विचका करणार नाहीत ना याबद्द्ल शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र बेस्टने हे आरोप फेटाळले आहेत.

Leave a Comment