स्कोडाच्या कोडिअॅक एसयूव्हीची झलक दिसली

skoda
येत्या १ सप्टेंबरला बर्लीन येथील वर्ल्ड प्रिमियममध्ये सादर केल्या जाणार्‍या स्कोडाच्या चार कारपैकी एसयूव्हीची पहिली झलक कंपनीने प्रिमियरपूर्वीच दाखविली आहे. ही एसयूव्ही भारतात २०१७ साली लाँच केली जाणार आहे. ही एसयूव्ही सात सीटर आहे.

यात एलईडी टेक्नॉलॉजीचे हेडलँप, सी शेप रिअर लाईट, एरिया व्ह्यू, टेा असिस्टसारखी अत्याधुनिक चालक असिस्टंस सिस्टिम दिली गेली आहे. स्कोडा कनेक्ट मोबाईल ऑनलाईन सेवाही असून त्यात इंफोटेनमेंट ऑन सर्व्हीस व केअर कनेक्ट सेवा यांचा समावेश आहे. या कारसाठी पाच इंजिन ऑप्शन्स आहेत. त्यातील दोन टीडीआय डिझेल तर तीन टीएसआय पेट्रोल आहेत.त्याला सहा स्पीड मॅन्युअ्ल व डीएसजी ट्रान्समिशनने जोडले गेले आहे.

Leave a Comment