मुलगा नको, मुलगीच हवी असणारे गांव

meghalay
भारतीयांची अपत्यांबाबतची मानसिकता पाहिली तर बहुतेक सर्व घरात मुलीपेक्षा मुलाच्या जन्माचा सोहळा अधिक आनंदात साजरा केला जातो. बहुतेकांना वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा असतो. पण मेघालयमधील मावलीनांग हे गांव याला सणसणीत अपवाद आहे. येथे राहणार्‍या खासी समाजात मुलीचा जन्म सौभाग्याचा तर मुलाचा जन्म दुर्भाग्याचा समजला जातो. या गावात सगळे महिला राजच आहे. सर्वत्र महिलांची सत्ता चालते. मुले आईचे आडनांव लावतात.

meghalay1
या गावाची प्रसिद्धी इतकीच नाही. हे गांव आशियातील सर्वात सुंदर, स्वच्छ गांव म्हणूनही प्रसिद्ध आहे. म्हणूनच त्याला ईश्वराचा बगीचा असेही म्हटले जाते. या गावात तलाव, झरे यांची रेलचेल आहे. या गावात महिलांना कोणतेही काम करण्याची पूर्ण मुभा आहे आणि सर्व मुली कामे करून घरच्या उत्पन्नाला हातभार लावतात. मुली त्यांच्या पसंतीने विवाह करतात व घटस्फोट घेण्याचीही त्यांना पूर्ण मोकळीक आहे. घरातील सर्वात धाकटी मुलगी ही घरच्या संपत्तीची वारस अ्रसते.

मुलींचे राज्य असलेल्या या गावाचे सौंदर्य पाहण्यसाठी देशविदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात.

Leave a Comment