देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे निर्देश

selfie
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसात पर्यटनस्थळी सेल्फी घेताना जीव जाण्याचे प्रकार समोर आले असून या प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतीक आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली आहे.

पर्यटनस्थळांवर सेल्फी काढताना जीव जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सरकारने पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली. महेश शर्मा यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून पर्यटन स्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करुन तशा सूचना करण्याचे निर्देश दिले आहेत. या ‘सेल्फी डेंजर झोन’वर सीसीटीव्ही लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाला हा विषय गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Leave a Comment