१ दिवसात १ लाख उत्पादनांची अॅमेझॉनकडून विक्री

amazon
नवी दिल्ली – सोमवारी उत्पादनांची विक्री करण्याचा विक्रम ई-व्यापार क्षेत्रातील देशातील दुस-या क्रमांकाची कंपनी अॅमेझॉनने केला. अॅमेझॉन इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, ‘ग्रेट इंडियन सेल’ दरम्यान पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत एक लाख उत्पादनांची विक्री करण्यात आली.

अॅमेझॉन कंपनी देशातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर बनण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च करत असून कंपनीची प्रतिस्पर्धी आणि पहिल्या क्रमांकाची कंपनी फ्लिपकार्ट १० ऑगस्टपासून ‘फ्रीडम डे सेल’ सुरू करत आहे. रेडमी नोट३, मोटी जी४ प्लस, सॅमसंग ७ प्रो, मॅमी पोको पॅन्ट स्टाइल, सर्फ एक्सेल २ किलोग्रॅम, पॅनासॉनिक टीएच ३२ इंच एलईडी टीव्ही आणि ऑरपॅट ड्राय आयर्न यांची सर्वात जास्त विक्री झाल्याचे सांगण्यात आले. अॅमेझॉन इंडियाच्या २०१६च्या पहिल्या तिमाहीत उत्पादनांची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत १५० टक्क्यांनी वाढली आहे.

Leave a Comment