सॅमसंग गॅलेक्सी ७ मुळे स्वस्त होणार गॅलेक्सी ५

samsung
नवी दिल्ली : आपला नवा स्मार्टफोन गॅलेक्सी नोट ७ सॅमसंगने बाजारात उतरवल्यानंतर गॅलेक्सी नोट ५ ची किंमत कमी केल्यामुळे हा स्मार्टफोन आता ४० हजार रूपयांना उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची किंमत पूर्वी ५४ हजार रूपये होती.

१९ ऑगस्टपासून अमेरिकेच्या बाजारात सॅमसंगने आपला गॅलेक्सी नोट ७ उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च होणार हे अजून स्पष्ट झाले नाही. ११ ऑगस्ट रोजी भारतात कंपनी एक इव्हेंट करणार असून यावेळी आपला हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. भारतातील सॅमसंग गॅलॅक्सी नोट ७ ची किंमत जवळपास ६० हजार रुपये ऐवढी असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment