देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप

strike
मुंबई – देशभरातील बँकांनी आज एकदिवसीय संप पुकारला असून बँकिग क्षेत्रात केंद्र सरकार करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे. या संपात ९ बँकांचे अधिकारी आणि ८ लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. या संपामुळे बँकाच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.

चेक क्लीअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. युनाईटेड फोरम ऑफ बँक्स युनियन या शिखर संघटनेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारलाय. या बंदमध्ये स्टेट बँकेसह १० लाख बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचे विलनीकरण आणि आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण या आणि इतर कारणांसाठी बँकांचा आज संप असणार आहे. या संपामुळे बँकांच्या चेक क्लिअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल. त्यामुळे आत बँकेत जाणं टाळा उगाच वेळ फुकट जाईल.

Leave a Comment