१० हजारांपेक्षाही कमी किमतीचे कार्बनचे दोन स्मार्टफोन लाँच

karbbon
नवी दिल्लीः आज फॅशन आय आणि फॅशन आय २.० हे दोन स्मार्टफोन कार्बनने लाँच केले आहेत. कार्बनने हे दोन्ही फोन ‘स्टॉक’ नावच्या फॅशन कंपनीसोबत मिळून बाजारात आणले आहेत. फॅशन आयची किंमत ५ हजार ४९० रुपये आहे, तर फॅशन आय २.० ची किंमत ६ हजार ४९० रुपये ठेवण्यात आली आहे. कार्बनने या फोनमध्ये प्रीलोडेड फॅशन अॅप दिले आहेत. युझर्स यामध्ये वेगवेगळे आऊटफीट्स सर्च करु शकतात. या फोनचा एआय सर्च पॅटर्न जबरदस्त असल्याचे बोलले जात आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटप्रमाणेच यामध्ये विविध प्रकारचे फॅशन आऊटफीट्स सर्च करता येणार आहेत.

याफोनचा डिस्प्ले ५ इंचाचा असून तो एचडी आहे. यात १.३GHz क्वाड-कोअर प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. याचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment